मुंबई प्लेऑफचं तिकीट मिळवणार? वानखेडेवर हैदराबाद विरोधात ‘करो या मरो’चा सामना

मुंबई : (IPL 2023 MI Vs SRH) आज म्हणजेच २० मे ला वानखडे मैदानावर एक मोठा रंजक सामना रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा भिडणार आहे. मुंबई इंडियन्सला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं खूप महत्त्वाची गोष्ट असेल. कारण मुंबईला जर आयपीएल २०२३ च्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर हा सामना जास्त धावसंख्येने जिंकणे महत्त्वाचे आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने नाणेफेक जिंकली आहे. रोहितचा संघाने प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर हैदराबादचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरुवात करेल. रोहितने नाणेफेक जिंकल्यानंतर संघ जाहीर केला आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित म्हणाला, ” खेळपट्टीचे स्वरूप पाहून आम्ही धावांचा पाठलाग करणार आहोत. तसेच थोडे कोरडे आहे, जे काही व्हायचे ते पहिल्या डावात होईल. शोकीनच्या जागी कार्तिकेय संघात आला आहे. हे अवघड आहे पण आम्हाला फक्त खेळ जिंकायचा आहे आणि तो कसा करायचा याचा विचार डोक्यात नाही. हा सामना जिंकण्याची आम्हाला संधी मिळणार आहे. फार पुढचा विचार केला नाही. काय करायचे आहे ते आम्ही टीम मीटिंगमध्ये ठरवले आहे. आम्ही यापूर्वी दुपारचा खेळ खेळला आहे. येथील खेळपट्टी आणि परिस्थिती काय आहे याची आम्हाला जाणीव आहे. जिंकण्यासाठी आम्हाला फक्त चांगला खेळ करायचा आहे.”
मुंबई इंडियन्सच्या संघात आजच्या सामन्यासाठी संघाचा मॅचविनर खेळाडू तिलक वर्मा पुन्हा परतला आहे. तो दुखापतीतून सावरला असून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना तो दिसेल. प्लेइंग इलेव्हन तिलक नसून तो इम्पॅक्ट प्लेअर्समध्ये आहे. त्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दिसू शकतो. तर गोलंदाजीमध्ये ह्रितिक शौकीनच्या जागी कुमार कार्तिकेय आजच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. तर आजच्या सामन्यात हैदराबादने वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संघात संधी दिली आहे.