माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल

मुंबई | Manohar Joshi – राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दरम्यान, मनोहर जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले होते.
काल (22 मे) रात्री मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्यांना तातडीनं हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्याात आलं. तसंच सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. तर हिंदुजा रुग्णालयाताली डॉक्टरांकडून लवकरच मनोहर जोशींच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाणार आहे.
दरम्यान, मनोहर जोशी हे गेल्या काही काळापासून राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांनी शिवसेना पक्षाकडून विधानपरिषदेवर निवडून येऊन आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ते 1976 ते 1977 या काळात मुंबईचे महापौर होते. तसंच शिवसेना- भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यानंतर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले होते.