Top 5क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

सीएसके नाणेफेक हरली, GT चा फलंदाजीचा निर्णय; गुरु शिष्यात मोठी लढत, कोण जिंकणार ?

चेन्नई : क्वालिफाय झालेल्या चार संघांपैकी पहिल्या दोन म्हणजेच सीएसके (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) मध्ये सामना रंगत आहे. (CSK vs GT) हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) GT ने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना मोठा अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम (M A Chitambaram stadium) स्टेडीयमवर हा सामना होत आहे. GT आणि CSK यांच्यातील यावर्षी एकही सामना GT संघ हरलेलला नाही. त्याचबरोबर आज नाणेफेक देखील GT ने जिंकला आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो फायनलला पोहोचणार आहे. तर, जो संघ हरेल त्यांना आणखी एक संधी आहे फायनलला जाण्याची.

दरम्यान, माहीच्या मार्गदर्शनाखाली घडलेला पांड्या पुन्हा एकदा आपल्या गुरूच्या विरुद्ध आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोणता संघ आज बाजी मारणार, हे बघण्यासाठी सळ्यांची उत्सुकता वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये