ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…तर दोन वर्षापूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं”, अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा

नागपूर | Anil Deshmukh – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी खळबळजनक विधान केलं आहे. दोन वर्षांपूर्वी माझ्याकडे तुरूंगात असताना दोन प्रस्ताव आले होते. त्यावेळी जर मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई झाली नसती. पण तेव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

यावेळी अनिल देशमुख म्हणाले, “तुरूंगात जाण्याचा त्रास मी सहन केला. त्यावेळी मी खोटे आरोप कोणावर करावेत याबाबत मला सांगितलं गेलं होतं. पण समझोता करण्यास मी नकार दिला. मी कुणावरही खोटे आरोप करणार नाही, असं स्पष्ट सांगितलं. त्यामुळे हे सगळं मला भोगावं लागलं.”

“ईडीचा अनेक कारणांमुळे त्रास सुरू आहे. आमच्याविरोधात बोललं, भूमिका घेतली, भाषण केलं तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. जयंत पाटील यांनी देखील त्यांच्यावर भाजपकडून दबाव होता असं स्पष्ट केलं होतं”, असंही अनिल देशमुखांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये