मोठी बातमी! माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हाकलपट्टी

मुंबई | Ashish Deshmukh – काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. पक्ष शिस्त मोडल्याचा फटका त्यांना बसला आहे, त्यामुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आशिष देशमुखांची पक्षातून हाकलपट्टी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पक्ष शिस्त मोडल्यामुळे आशिष देशमुख यांचं सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता निलंबनानंतर ते काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच ते भाजपमध्ये जाऊ शकतात, अशा चर्चाही सुरू आहेत.
आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वारंवार विधाने केली होती. त्यामुळे त्यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली होती. तसंच काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक जारी केलं आहे. त्या पत्रकात आशिष देशमुखांना निलंबित करण्यात आलं आहे.
आशिष देशमुख यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं देशमुख यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल 5 मार्च रोजी कारणे दाखवा अशी नोटीस बजावली होती. त्यावर 9 एप्रिल रोजी देशमुखांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर त्यांच्या उत्तरावर शिस्त पालन समितीत चर्चा करण्यात आली आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं.