ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“यावेळी जर ट्रेन सुटली तर आपल्या देशातून…”, उद्धव ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका

मुंबई | Uddhav Thackeray – आज (24 मे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेतली. तसंच अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे शरद पवार यांची भेट घ्यायला जाणार आहेत. तर मातोश्रीवर झालेल्या भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या काही दिवसांमध्ये आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले आहेत. मातोश्री आणि शिवसेना नातं जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही लोकं फक्त राजकरण करत असतात. मात्र, आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जपतो. येणारं वर्ष हे निवडणुकीचं असून जर यावेळी ट्रेन सुटली तर आपल्या देशातून लोकशाही गायब होईल. त्यामुळे लोकशाहीला वाचवण्यासाठी देशातून जे लोकशाही हटवू इच्छितात त्यांना मी विरोधी पक्ष म्हणेन.”

“सर्वोच्च न्यायालयानं गेल्या काही दिवसांमध्ये दोन निकाल दिले आहेत. एक दिल्लीच्या बाबतीत तर दुसरा शिवसेनेच्या बाबतीत. लोकप्रतिनिधींचं लोकशाहीत सर्वात जास्त महत्त्व असतं. सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकार आणि आपच्या बाबतीत दिलेला निर्णय लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण केंद्र सरकारनं त्याविरोधात अध्यादेश काढला. तर आता असे दिवस येतील की राज्यांमध्ये निवडणुका होणारच नाहीत, फक्त केंद्रात होतील”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये