देश - विदेश

शुबमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ प्रकरणी दिल्ली महिला आयोगाची पोलिसांना नोटीस

नवी दिल्ली : गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध रॉयल चालेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात झालेल्या सामन्यानंतर बॅंगलोर संघ बाहेर पडला आणि मुंबईला (MI) क्वालिफाय होण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि गुजरात (GT) संघाच्या शुबमन गिल (Shubman Gill) या दोघांनीही शतकी खेळी खेळली होती.

शुबमनच्या जबरदस्त खेळीमुळे बॅंगलोर संघाची क्वालिफाय होण्याची संधी गमवावी लागली. त्यांनतर बॅंगलोरच्या चाहत्यांनी शुबमनला (Shubman Gill) मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले. मात्र, बॅंगलोरचे चाहते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शुबमनच्या बहिणीला म्हणजेच (Shahneel Gill) शाहनील गिलला देखील धारेवर धरले आणि मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. सोशल मीडियावर तिला अश्लील शिवीगाळ करण्यात आली.

त्यानंतर या घटनेची दखल थेट दिल्ली महिला आयोगाने (Women’s Commission Delhi) घेतली होती. दिल्ली महिला आयोगाच्या (Women’s Commission Delhi) प्रमुख स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनीही सामना संपल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांची निंदा केली आणि शाहनील गिलला मिळालेल्या वाईट गैरवर्तनाचा निषेध केला. त्यानंतर आता महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना एफआयआर नोंदवण्याची नोटीस पाठवली आहे आणि पोलिसांना 26 मे पर्यंत सविस्तर कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये