महिला कुस्तीगिरांच्या समर्थनार्थ छात्रभारतीची दादर रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने
दादर : आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचवणाऱ्या आणि देशाला अनेक सुवर्णपदके मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीगिरांच्या समर्थनार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज दादर रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने करण्यात आली.
“खासदार ब्रिजभुषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप असताना भाजपा सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. गेल्या 38 दिवसांपासून या सर्व महिला खेळाडू दिल्लीच्या जंतर-मंतर वर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत परंतु देशाचे नाव जगापुढे उंचवणाऱ्या खेळाडुंना रविवारी ज्या पद्धतीने पोलिस बळाचा वापर करुन फरफटत नेण्यात आले त्यांचे आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न केले. त्यांच साध म्हणने ऐकण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून झाले नाहीत. हे निंदनीय असून मुंबईतील सर्व विद्यार्थी या महिला खेळाडूंसोबत खंबीरपणे उभे आहेत.” असे म्हणत, ब्रिजभुषण सिंग यांना तात्काळ अटक करुन महिला कुस्तीगिरांना न्याय मिळावा अशी मागणी छात्रभारतीने केली आहे. तशी निदर्शनेही त्यांनी केली आहेत.
मुंबई उपाध्यक्ष दिप्ती शेलार, राज्य संघटक स्वाती त्रिभुवन, अनुराधा त्रिपाठी, वर्षा गायकवाड,जिविता पालकर,मानवी बाविस्कर, संजना कांबळे, PSU च्या साम्या कोरडे यांच्या नेतृत्वाखाली आजचे आंदोलन पार पडले तद्प्रसंगी छात्रभारतीचे निकेत वाळके, भवानजी कांबळे, सौरभ बांगर, चेतन कांबळे, वैभव गाडेकर, निलेश झेंडे, तुषार वायकर, किरण मोहकर,वैभव वैद्य उपस्थित होते असे छात्रभारती मुंबई अध्यक्ष विकास पटेकर यांनी सांगितले.
Vinesh Phogat Bajrang Punia SakshiMalik Kadian