इतिहासाची साक्ष ‘काँग्रेसची इमारत’ इंदापूरचा नेता घालतोय घशात ?

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : १९७४ साली ११३ निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतःच्या वर्गणीतून इंदापूर काँग्रेस कमिटीची जागा खरेदी करून त्यावर बांधलेली इमारत काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिली, तथापि ही मालमत्ता आता इथे एका राजकीय पुढाऱ्याच्या घशात घालण्याचे षडयंत्र सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सत्तास्थानामध्ये महत्त्वाची जबाबदारी बजावणारा हा नेता आता बारा गुंठ्याच्या जागेसाठी एका ऐतिहासिक वास्तूची मोडतोड करतोय…! या अशोभनीय वर्तनाची चर्चा सध्या इंदापूरमध्ये पसरली आहे.
इंदापूर नगर परिषदेच्या हद्दीत १२ गुंठे क्षेत्रावर इमारत उभी आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पैसे जमा करून १९७४च्या काळात एकूण २११ रुपये भरून ही जागा ‘सरचिटणीस- इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी’च्या नावावर केली होती. तसे आदेश कागदपत्रेदेखील पुणे जिल्हा अधिकारी, प्रांत व इंदापूर नगर परिषदेने दिले होते. तालुका काँग्रेस कमिटीच्या नावाने उतारादेखील बनविण्यात आला. त्यावेळी तालुक्यातील कानाकोपऱ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही सार्वजनिक हिताची इमारत उभी केली होती.
परंतु त्यानंतर ‘इंदापूर चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना कधी झाली? त्या ट्रस्टला ही जागा कशी, कोणी आणि कधी दिली? त्यामध्ये खरोखरच काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत का? पैसे भरून, वर्गणी काढून मूळ सभासद झालेल्या मूळ मालकांचे पुढे काय झाले? असे असंख्य प्रश्न सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पडले आहेत. इंदापूर चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी ह्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती सार्वजनिक जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
स्व. वसंतदादांनी केले होते उद्घाटन
२९ सप्टेंबर १९७७ रोजी इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानिमित्त या इंदापूर काँग्रेस भवनाचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय नामदार वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. त्या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी खुद्द शरद पवार आणि त्यावेळचे राज्यमंत्री आबासाहेब निंबाळकर, तसेच मजूर मंत्री शंकरराव पाटील उपस्थित होते, अशी निमंत्रण पत्रिकादेखील उपलब्ध आहे.
‘राष्ट्रसंचार’च्या हाती मूळ सभासदांची यादी
या काँग्रेस कमिटीच्या जागेकरिता आणि इमारतीकरिता ज्या सभासदांनी एकूण २११ रुपये वर्गणी काढून इमारत उभी केली. सभासदांची यादी राष्ट्रसंचारच्या हाती आली आहे. त्यापैकी त्याचे मूळ संस्थापक सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. इतर सभासददेखील पुढे दिले आहेत.
मूळ ११३ सभासदांची नावे
- आबासाहेब शंकरराव पाटील (लासुर्णे), पांडुरंग कृष्णाजी जगताप (इंदापूर), राजेंद्रकुमार बाबुराव घोलप (उदमायवाडी), कृष्णाजी यशवंतराव रणसिंग (निमसाखर), प्रभाकर बाबुराव गलांडे (इंदापूर), गोकुळदास विठ्ठलदास शहा (इंदापूर), श्रीकृष्ण गोविंद बंगाळे (इंदापूर), नारायण लक्ष्मण कोकाटे (सराटी), मच्छिंद्र धोंडिबा पाटील (डाळज), मारुतराव संताराम शिरसट (शिरसटवाडी), मुकिंद गोकुळदास गुजर, हिरालाल दामोदर कोतमिरे, भगवानदास महादेव सूर्यवंशी, कुशकुमार रामचंद्र विंचू (सर्व इंदापूर), धैर्यसिंग शिवाजीराव गायकवाड (सणसर), निवृत्ती श्रीपती सपकळ (सपकळवाडी), शिवाजी मार्तंड रुपनवर (उद्धट), भालचंद्र बापूजी मेटेय (वालचंदनगर), मोतीराम निवृत्ती जगदाळे (सराटी), भगवान यशवंत काळे (पळसदेव), प्र. कृ. वरेकर (वालचंदनगर), गणपत सीताराम पाटील (कळस) आदी सभासद होते.
- तसेच इंदापूरचे गणपतदास मगनलाल शहा, प्रकाश गणपतदास शहा, चंद्रकांत स्वरूपचंद दोशी, वालचंदनगरचे रामचंद्र बंडोपंत कामत, भारत मोतीचंद कोटाडिया, वसंत शंकरराव कांबळे, गोविंद गणेश बोकील, मौला चांदसाहब शेख, प्रभाकर विष्णु कुलकर्णी, दत्तात्रय संताजी खोत, पोपट शिवराम रणमोडे, अनंत गजानन केसकर, वसंत वासुदेव अमडेकर होते. शंकरराव बाजीराव पाटील (बावडा), र. के. खाडिलकर (पुणे), ॲड. बाबासाहेब जगन्नाथ व्होरकाटे (बारामती), हनुमंत जगन्नाथ सरक (उद्धट), ते कळसचे रजनीकांत रामचंद्र शहा, नामदेवराव सीताराम पाटील, घमा दगडू पवार, अप्पा भागू खारतोडे, रमणलाल मुकुंदचंद शहा, कृष्णा साबू खारतोडे, शेळगावचे भगवान यशवंत भुजबळ, पांडुरंग माणकोजी शिंगाडे, साहेबराव पांडुरंग शिंगाडे, आबासाहेब नामदेव शिंगाडे, रामचंद्र कृष्णाजी जाधव, विठ्ठल कृष्णा शिंगाडे, गुलाबराव मारोतराव चवरे, मधुकरराव नारायणराव शेरकर, बाबुराव रामचंद्र शिंगाडे, मल्हारी साहेबराव सुपुते होते.
- नामदेव गणपतराव पाटील, उत्तम जिजाबा देवकर, कालिदास हरिश्चंद्र देवकर (लोणी देवकर), शिवाजीराव गोविंदराव पाटील, गुणवंतराव शंकरराव पाटील, तुकाराम हरी खरात, बजरंग शंकर वाघमोडे, सुभाष कांतीलाल गांधी (लासुर्णे), तुकाराम खंडू गवळी (बोरी), दादा केसू चव्हाण, प्रतापराव बापूसाहेब देशमुख (भावडी), इंदापूरचे सुरेश विठ्ठलदास शहा, किसन सांब बानकर, विष्णुदास दामोदरदास शहा, कन्हैयालाल गोवर्धनदास शहा, रतन पंढरीनाथ कवितके, किसन हरिभाऊ कोकाटे, गणपतराव तुळशीराम गानबोटे, शरद विष्णु पलंगे, सुरेश मुरलीधर कोतमिरे, मदनमोहन विष्णुदास गुजर, सुधाकर दिगंबर ढोले, अंथुर्णे गावचे सावळा आबा धापटे, छगन सखाराम चौगुले, भगवान रामा भरणे, विठ्ठल रामा भरणे, भिगवणचे शामराव पांडुरंग वाघ, नामदेवराव पर्वती झगडे, जगन्नाथ पांडुरंग सूर्यवंशी, देवराम विठोबा धुमाळ, कुंडलिकराव नामदेवराव वाघ, उत्तम दादा काळे, तात्याराम विठ्ठल शिंदे, दत्तात्रय पांडुरंग जाधव (कालठण) होते.
- तसेच विनायक बाबुराव लोखंडे (हिंगणगाव), शहाजीराव बाजीराव पाटील (बावडा), तात्याराम विठ्ठल शिंदे (अंथुर्णे), बेलवाडीचे शिवाजीराव गेनू जाधव, सोपानराव तात्याबा जामदार, शहाजीराव मारुतरराव मचाले, जगन्नाथ मारुतराव मोरे, गणपत मोरे, (नि. केतकी), बाजीराव दिनकरराव जाचक (सणसर), वालचंदनगरचे दत्तात्रय दिगंबर दळवी, पांडुरंग तात्याबा जाधव, सदानंद रामचंद्र पवार, विष्णू शंकर कळंबकर, विजय विश्वनाथ वैगंणकर, पांडुरंग रामचंद्र चव्हाण, माणिकचंद भिकाराम लखोटे, बाळासाहेब गणपत जाधव, तुकाराम बाबुराव रासकर, भूपाल पुरंधर तुपाळये, मधुकर ज्ञानेश्वर काकडे व हनुमंतराव पांडुरंग वाबळे (शेटफळगडे), देविदास आनंदराव बंडगर (मदनवाडी), भरत सोमा धुमाळ, दादासाहेब संभाजी नरुटे, मोतीलल गुलाबचंद शहा (पळसदेव) असे एकूण ११३ सभासद होते. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वर्गणी करून, इंदापूर काँग्रेस भवनची जागा शासनाला फी भरून घेण्यात आली व नंतर सार्वजनिक हितासाठी वर्गणी करून इमारत बांधण्यात आली होती.