धक्कादायक! प्रेयसीचा भेटण्यास नकार; प्रियकराने आयुष्य केलं बेकार, तीन दिवस डांबून ठेवून केले अत्याचार..

नागपूर : (Nagpur Crime News) सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पोलिसांना गुन्हे रोखण्यात सतत अपयश येत आहे. महाराष्ट्र राज्य युपी, बिहारप्रमाणे गुन्हेगारी क्षेत्रात पुढे येत तर नाही ना? अशी भित अनेकांना वाटू लागली आहे. अशातच नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने तरुणीला वर्ध्यातील एका खोलीत ठेवून तिच्यावर सलग तीन दिवस बलात्कार केला. तिने अत्याचाराला विरोध केला असता मारहाण करण्यात आली. पीडितेने नागपुरात परतल्यानंतर आरोपी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. विशाल पृथ्वीलाल गुप्ता (वय 21) असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी आणि पीडित तरूणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 31 मे रोजी वाठोडा पोलिस ठाण्यात 20 वर्षीय तरुणी हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. या घटनेची गंभीर नोंद घेत पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरू केला होता. दरम्यान आरोपी मुलीला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली. पोलिसांनी तेथे पोहोचून मुलीची सुटका केली. मात्र, आरोपी तेथून फरार होण्यात यशस्वी झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थीनीला आरोपी विशालने प्रेमाच्या जाळ्यात ओळले. तो तिच्या आई-वडिलांसमोर तिच्या प्रेमाची मागणी करत होता. 31 मे रोजी विशालने तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. तरुणी भेटण्यासाठी न आल्याने आरोपी विशालने बळजबरी करत तिचे अपहरण करून वर्धा येथे दुचाकीनर नेले.
वर्ध्यातून आरोपी तरुणीला मुंबईला घेऊन गेला. तेथे पाच दिवस ठेवल्यानंतर तरुणीला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे नेले. या ठिकाणी आरोपीने एका खोली तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने पीडितेचे अनेक दिवस शारीरिक शोषण केले. तसेचं बाहेर अत्याचाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणीला बेदम मारहाण केली.
मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी वाठोडा पोलिस ठाण्यात फिर्यात दिली होती. मागील दोन दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.