भाकरी फिरवणे म्हणतात, ही नुसती धूळफेक; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड

नागपूर : (Devendra Fadnavis On Sharad Pawar) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या भाकरी फिरवण्याची चर्चा सुरू झाली असून आता या भाकरी फिरविण्याचा चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला नाही वाटत याला भाकरी फिरवणे म्हणतात, ही नुसती धूळफेक आहे, ही त्यांची अंतर्गत बाब आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलत होते. या टीकेची आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, मी नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत आहे. केंद्र, राज्य शासनाच्या सर्व योजना, शासकीय दारी योजना, घरकुल योजनेची माहिती, तसेच लोकांच्या वैयक्तिक समस्या, अडचणी यांचा आढावा घेतला. या आढाव्यामुळे गोष्टी पुन्हा रुळावर आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.