ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं खुलीच, त्यांनी…”, उपमुख्यमंत्र्यांची युतीसाठी ऑफर

पुणे : (Keshavprasad Maurya On Uddhav Thackeray) ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरणं तापलं आहे. जाहिरातीमुळे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच भाजपा नेत्याने शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मैत्रीची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मोदी@ ९ महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं उघडीच आहेत,” असं मौर्य म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील, तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी. भाजपचे दरवाजे बंद नसतात. भाजपाचे दरवाजे उघडीच असतात. पण, उद्धव ठाकरेंना चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. भाजपा चर्चेचा प्रस्ताव ठेवणार नाही. कारण, त्यांनी चूक केली आहे, भाजपाने चूक केली नाही,” असं मौर्य यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये