दादांची दादागिरी! शिंदे-फडणवीस यांच्याकडील ‘ही’ महत्त्वाची खाती अजित पवार गटाने हिसकावली?
मुंबई : (Ajit Pawar On Shinde-Fadnavis) राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात बंड केलं आणि शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. राजकीय वर्तुळात घडामोंडीना वेग आहेत. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीला बरेच दिवस उलटून गेले तरी मंत्र्यांचे खातेवाटप मात्र अद्याप झालेले नाही. तर आपल्या मंत्रीपदाला कात्री लागण्याची शक्यता असल्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, एकंदरीत पाहाता मंत्रिमंडळात अजित दादांची दादागिरी दिसून येत आहे. कारण सर्व महत्त्वाची खाती त्यांना मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
मंत्रिमंडळात अर्थखाते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवले जाणार आहे. तर सहकार मंत्रालयाची जबाबदारी ही दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दिली जाणार आहे. ही दोन्ही खाती यापूर्वी भाजपकडे होती. त्यामुळे मोठ्या चर्चेनंतर भाजपकडील ही खाती राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जवळपास ही खाती निश्चित झाली आहेत, तर आजच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाला मिळणारी अंदाजे खाती
१) अर्थ खाते – अजित पवार
२) कृषी खाते- छगन भुजबळ
३) सहकार खाते- दिलीप वळसे पाटील
४) परिवहन- धर्मराव अत्राम
५) सामाजिक न्याय – धनंजय मुंडे
६) अन्न नागरी पुरवठा – अनिल भाईदास पाटील
७) महिला बाल कल्याण – अदिती तटकरे
८) क्रीडा – संजय बनसोडे
९) अल्पसंख्यांक – हसन मुश्रीफ