ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

“आम्ही महिलांना कोणत्याही खेळात प्यादे बनू देऊ शकत नाही…”, मणिपूर घटनेवरून प्रियांका चोप्रा संतापली

Manipur Violence – सध्या मणिपूर (Manipur) घटनेनं सपूर्ण देश हादरला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका जमावानं दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याचं दिसलं. तसंच तो जमाव त्यांना एका शेतात घेऊन जाताना दिसला. यावेळी जमावातील काही लोक पीडित महिलांच्या शरीराला ओरबाडत, मारहाण करत त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचंही दिसले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.

या संतापजनक घटनेवर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ही स्टोरी शेअर करत तिनं म्हटलं आहे की, “हा व्हिडीओ व्हायरल झाला गुन्हा घडल्यानंतर 77 दिवसांनी, यावर कारवाई होण्यापूर्वी. कारण? या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. काहीही परिस्थिती असो आम्ही महिलांना कोणत्याही खेळात प्यादे बनू देऊ शकत नाही. आता त्वरित न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे.”

“ही घटना लाजिरवाणी असून ही सामूहिक शरमेची बाब आहे. मणिपूरच्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे”, असं म्हणत प्रियांकानं तिचा संताप व्यक्त केला आहे.

image 3

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये