“अजित पवार हे कधी ना कधी…”, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा
मुंबई | Praful Patel – गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्या वाढदिवसादिवशी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी होर्डींग्ज लावले होते. यावर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. तसंच अनेक नेत्यांकडून देखील अजित पवार मुख्यमंत्री होतील असा दावा करण्यात आला आहे. अशातच आता अजित पवार यांच्या गटातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मोठी दावा केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. आज ना उद्या अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.
“अजित पवार हे महाराष्ट्रातील वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्रात आमच्या पक्षाचं नेतृत्व करत आले आहेत. तसंच कधी ना कधी ते मुख्यमंत्री होतीलच. कारण काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या नाहीतर परवा संधी मिळत असते. त्यामुळे अजित पवार देखील मुख्यमंत्री होतील”, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.