IND vs WI : मालिका बरोबरीत! ‘करो या मरो’च्या सामन्यात कोण मारणार बाजी?
Ind Vs Wi ODI Series 2023 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील आज अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर हा सामना होणार असून दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. अखेरचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. सध्या तीन सामन्याची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.
त्यामुळे अखेरचा सामना जिंकून मालिक खिशात घालायच्या उद्देशाने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहे. पहिला वनडे सामना भारतीय संघाने जिंकला होता, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत वेस्ट इंडिजने पलटवार केला. आता तिसरा आणि निर्णायक सामना कोण जिंकणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य लागलं आहे.
अखेरच्या एकदिवसीय सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहली पुनरागमन करतील. दुसऱ्या सामन्यात सिनिअर खेळाडूंना आराम दिला होता. दोन्ही एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. गोलंदाजांनी आले काम चोख बजावले होते. आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ कसा कामगिरी करतो? याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलेय. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’चा असणार आहे.