ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

चंद्रमुखी-2 : कंगना रनौतचा फर्स्ट लूक आऊट! शाही अंदाजात दिसली ‘पंगाक्वीन’

Kangana Ranaut Chandramukhi 2 First Look Out : बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ अर्थात कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी ‘चंद्रमुखी 2’ (Chandramukhi 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमातील अभिनेत्रीचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘चंद्रमुखी 2’ सिनेमातील कंगनाचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगना रनौतने ‘चंद्रमुखी 2’ (Kangana Ranaut Shared Chandramukhi 2 Look) सिनेमातील या लूकमध्ये ‘पंगाक्वीन’चा शाही अंदाज पाहायला मिळत आहे. कंगनाने लूक शेअर करत लिहिलं आहे,”सौंदर्यवती… आणि तिच्या अदा… लक्ष वेधून घेणारी ‘चंद्रमुखी’. चंद्रमुखी 2′ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री पहिल्यांदाच राघवसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

‘चंद्रमुखी 2’ हा सिनेमा 2005 मध्ये आलेल्या पी. वासु दिग्दर्शित सिनेमाचा सीक्वेल आहे. या सिनेमात रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत झळकले होते. आता प्रेक्षकांना ‘चंद्रमुखी 2’ या सिनेमाचा सीक्वेल आहे. तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

हा सिनेमा 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाचा आगामी ‘इमर्जन्सी’ (Emergency) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोन्ही सिनेमांची चाहते आता प्रतीक्षा करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये