विश्वकर्मा योजनेला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली | बुधवारी मंत्रिमंडळाने विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. १५ ऑगस्टच्या भाषणात पीएम मोदींनी या योजनेचा उल्लेख केला होता. याद्वारे देशातील लहान कामगार आणि कारागिरांना आर्थिक मदत होणार आहे. त्यांना कर्ज आणि प्रशिक्षण, प्रगत तंत्रे आणि कौशल्यांची माहिती यासंबंधी मदतही दिली जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
तसेच केंद्र सरकारने जनतेला मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने जनतेला १० हजार इलेक्ट्रिक बसेसची भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीएम ई-बस सेवेला मंजुरी दिली आहे. पीएम ई-बस योजनेअंतर्गत १० हजार ईव्ही बस चालवण्याची योजना आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पीएम ई-बस सेवेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी ७७.६१३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पीएम ई-बस सेवेमध्ये देशभरात सुमारे १० हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.