“देवेंद्र फडणवीसांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची…”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका
!["देवेंद्र फडणवीसांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची...", शरद पवारांची स्पष्ट भूमिका sharad pawar devendra fadnavis](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/sharad-pawar-devendra-fadnavis-780x470.jpg)
जळगाव | Sharad Pawar – जालना (Jalna) जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. तसंच अनेक राजकीय नेत्यांनी राजकीय सरकारवर गंभीर आरोप देखील केले आहेत. या पार्श्वभूमीवर काल (4 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी जाहीर माफी मागितली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची कबुलीच देणं आहे. मला एवढंच माहिती आहे जालन्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथे पोलिसांनीच हल्ला केला हे उघडपणे दिसत आहे. त्यामुळे सरकारनं याची चौकशी करावी. कारण याचे अधिकार सरकारला आहेत, आम्हाला ते नाहीत.
ओबीसी कोट्यामधून आरक्षण दिलं तर ओबीसीमधील गरिबांवर अन्याय होईल. त्यामुळे 50 टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहे, असंही शरद पवार म्हणाले.