जालन्यातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद
![जालन्यातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद pimpri chinchwad 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/pimpri-chinchwad-1-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड | Maratha Jalna Protest – जालना (Jalna) जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर (Maratha Protest) झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला होता. यामध्ये आता पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या बंदला नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज (9 सप्टेंबर) पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. तर तेथील व्यावसायिकांनी देखील स्वयंस्फूर्तीनं दुकानं बंद ठेवली आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, आकुर्डी, पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर या भागातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. तर शाळा, महाविद्यालये, कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा देखील बंद आहेत. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसंच पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पिंपरी चौकापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.