रोहित-गिलचा तांडव संपला! अन् मैदानावर मुसळधार पावसाची बॅटींग

कोलंबो : (India vs Pakistan Asia Cup 2023 Super 4) भारत-पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला सामना मुसळधार पावसामुळे थांबवावा लागला आहे. सामना थांबला तोपर्यंत टीम इंडियाने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या.
सध्या केएल राहुल 28 चेंडूत 17 धावा आणि विराट कोहली 16 चेंडूत 8 धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 38 चेंडूत 24 धावांची भागीदारी झाली आहे.
या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. त्यानंतरही सामना सुरू झाला नाही, तर भारतीय संघ 24.1 षटकांपासूनच फलंदाजीला सुरुवात करेल. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
त्यापुर्वी भारतीय सलामीच्या जोडीने 16 चौकार आणि 4 षटकार ठोकत पाकिस्तानी गोलंदाजांच्या नाकीनऊ आनत मैदानावर तांडव मांडला होता. 121 धावांवर भारतीय संघाची पहिली विकेट पडली तसा तांडव संपला अन् मैदानावर पावसाची बॅटींग सुरु झाली.
कर्णधार रोहित शर्माने 49 चेंडूत 4 षटकार 6 चौकारांसह 56 धावा केल्या. तर गिलने 52 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या.