वेल्लालागे अन् असलंकाच्या भेदक माऱ्यापुढे टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली, 213 धावांत डाव संपला..

Asia Cup 2023, IND Vs SL : . रोहित शर्माची अपवाद सर्वाधिक 53 धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यासिवाय ईशान किशन 33 आणि केएल राहुल याने 39 धावांचे योगदान दिले.
वेलाल्लागे याने अचूक टप्प्यावर मारा करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केले. वेल्लालागे याने पाच विकेट घेतल्या. भारताचा संपूर्ण डाव 213 धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाला विजयासाठी 214 धावांचे आव्हान आहे.
भारतासाठी रोहित शर्मा आणि गिल यांनी 80 तर इशान किशन आणि केएल राहुल यांनी 63 धावांची भागिदारी केली. या दोन भागिदारीचा अपवाद वगळता एकही मोठी भागिदारी झाली नाही.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोची खेळपट्टी पाहून रोहित शर्माने टीम इंडियात अक्षर पटेल याला संधी दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियासाठी सावध सुरुवात केली. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली.