ताज्या बातम्यामुंबईसिटी अपडेट्स

कुर्ल्यामध्ये मध्यरात्री इमारतीला भीषण आग; 39 नागरिक गंभीर जखमी

Kurla Building Fire – कुर्ल्यामध्ये (Kurla) एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग (Building Fire) लागल्याची घटना घडली आहे. कुल्यातील डॉ. भीमराव रावजी आंबेडकर या इमारतीच्या तळमजल्यावर रात्री पावणे बाराच्या सुमारास आग लागली. इमारतीला आग लागल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर या घटनेची माहिती मिळताच आग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधून 50 ते 60 लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. तसंच इमारतीला लागलेली आग एवढी भीषण होती की त्यामुळे 39 लोक गंभीर जखमी झाले आहे. जखमींपैकी चार जणांना कोहिनुर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर 35 जणांना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. तर सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तसंच या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. पण, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये