क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

आशिया चषाकाच्या जेतेपदासाठी भारत-श्रीलंका आठव्यांदा आमनेसामने, पाहा आतापर्यंत कोण वरचढ

India vs Sri Lanka In Asia Cup Final : आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता रविवारी मिळणार आहे. भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती.

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यांमध्ये भारताने तीन वेळा विजय मिळवत हॅटट्रिक केली होती. त्यानंतर 1997, 2004 आणि 2008 मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध सलग तीन फायनल जिंकून हॅट्ट्रिक नोंदवली होती. मात्र, यानंतर दोघांमध्ये शेवटची विजेतेपदाची लढत 2010 मध्ये झाली, ज्यामध्ये भारताने विजय मिळवून आघाडी घेतली.

आता २०२३ मध्ये हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. रविवारी होणाऱ्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 2023 मध्ये होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विजेतेपदाच्या लढतीत दोघांमध्ये बरोबरी होणार की भारत आघाडी कायम ठेवणार?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये