ताज्या बातम्यामनोरंजन

गायक सलील कुलकर्णी यांना एकाच महिन्यात मिळाले दोन राष्ट्रीय पुरस्कार; शेअर केली खास पोस्ट

मुंबई | Saleel Kulkarni – लोकप्रिय गायक सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांना एका महिन्यात दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच 69व्या राष्ट्रीय चित्रपटांची घोषणा झाली. यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान प्रसिद्ध गायक, गीतकार सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला मिळाला. तर या चित्रपटानंतर आता सलील कुलकर्णी यांना आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार कोणता? याबाबत सलील कुलकर्णी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, गणपतीबाप्पा मोरया.. भारतरत्न लतादीदी दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय महाविद्यालयात भावसंगीतचा अभ्यासक्रम माझ्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्याचा निर्णय मंगेशकर कुटुंबीयांनी आणि सुरेशजी वाडकर, मयुरेश पै आणि राजीवजी मिश्रा यांनी घेतला. हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे असं मी मानतो. मी मनापासून दीदींचं नाव जपण्याचा प्रयत्न करीन.”

सलील कुलकर्णी यांच्या या खास पोस्टनं सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करताच अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, सध्या सलील कुलकर्णी हे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये