क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

विजयाची सप्तपदी! लंकादहन करत टीम इंडियाची दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री

मुंबई : (IND vs SL ODI World Cup 2023) वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेचा लाजीरवाना पराभव करत भारताने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री केला केली. लंकेचं दहन करत टीम इंडियाने विजयाची सप्तपदी साजरी केली. नवा इतिहासाची नोंद केली आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ५० षटकात ८ बाद ३५८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाचे आव्हान पार करताना श्रीलंकेचा डाव फक्त 55 धावात संपुष्ठात आल्याने 302 धावांना मोठा विजय संपादन केला आहे. भारतीय गोलंदाजीसमोर श्रीलंकेची अक्षरक्ष: दाणादाण उडाली. भारताकडून मोहम्मद शमीने ५ षटकात १८ धावा देत ५ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने ७ षटाकत १६ धावा देत ३ तर जसप्रीत बुमराहने ५ षटकात ८ धावा देत १ विकेट मिळवली. लंकेची अखेरची विकेट रविद्र जडेजाने घेतली.

टॉस जिंकून श्रीलंकेने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने ९२, विराट कोहलीने ८८ तर श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. या तिनही फलंदाजांचे शतक हुकले असले तरी टीम इंडियाने ५० षटकात ३५७ धावांची मोठी धावसंख्या उभी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये