पंजाब नॅशनल बँकेतील ’ही’ खाती आता होणार बंद; बँकेची ग्राहकांना नोटीस
काही कामानिमित्ताने बँकांमध्ये खाती उघडली जातात, पण अनेक खाती सांभाळणं जिकीरीचे काम असते. काही वेळा ग्राहकांना फारशा वापरात नसलेल्या बँक खात्यांचा विसरही पडतो. पंजाब नॅशनल बँकेनं अशी सक्रिय नसलेली बचत खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या ग्राहकांना अशी खाती सुरू ठेवण्याकरता ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
वापरात नसलेली बँकेची खाती कालांतराने बँकांद्वारे बंद केली जातात. पंजाब नॅशनल बँकेनंही अशी बचत खाती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. अशा बँक खात्यांचे केवायसी करण्याची नोटीस बँकेने ग्राहकांना पाठवली होती. ग्राहकांना ३० जूनपर्यंत ही मुदत वाढवली आहे. त्यानंतर ही खाती बंद होणार आहेत.
हेही वाचा- लग्नासाठी नवरी मिळाली नाही, तरुणाने थेट मॅट्रिमोनीवरच दाखल केली केस
पंजाब नॅशनल बँकेतील ज्या बचत खात्यांमध्ये गेल्या तीन वर्षामध्ये कोणताही व्यवहार झालेला नाही. तसंच ज्या खात्यांमधील बॅलन्स गेल्या तीन वर्षापासून शून्य रुपये आहे. अशी खाती बँक बंद करणार आहे. अशा खातेधारकांना बँकेने नोटिस पाठवली आहे. नोटिस पाठवल्यावर एक महिन्याने ते खाते बंद होईल. खातेधारकांना त्यांचे खाते सुरू ठेवायचे असेल, तर त्यांनी बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करणे जरूरी आहे.
हेही वाचा- “एनडीए सरकार संकटात? कारण…”; राहुल गांधी यांच्या ‘त्या’ दाव्याने चर्चांना उधाण
बँकेतील जी खाती सक्रिय नसतात, अशा खात्यांचा घोटाळेबाजांकडून गैरवापर होण्याची शयता असते. त्यामुळे बँकेनं अशी खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिल २०२४ मधील आकडेवारीनुसार बँकेने अशी खाती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. काही कारणामुळे बँक खातं बंद झालं व ग्राहकांना ते पुन्हा सुरू करायचं असेल, तर बँकेच्या ब्रॅन्चमध्ये जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. तसंच आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताही करावी लागेल. यामुळे बँक खातं पुन्हा सुरू होऊ शकतं. याबाबत बँकेत जाऊन अधिक माहिती मिळवता येऊ शकते.
हेही वाचा- हजसाठी गेलेल्या ५५० भाविकांचा उष्माघाताने मृत्यू, २,००० यात्रेकरू रुग्णालयात दाखल
पंजाब नॅशनल बँकेनं बचत खात्यांबाबत लागू केलेला नियम डीमॅट खात्यांबाबत लागू केलेला नाही. त्याशिवाय सुकन्या समृद्धी योजना , पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना (झचगगइध), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना , अटल पेन्शन योजना अशा योजनांसाठी उघडलेली ग्राहकांची खातीही बँक सुरू ठेवणार आहे. त्याशिवाय मायनर सेव्हिंग अकाउंटही सुरू राहणार आहेत. सोशल मीडियावर बँकेनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तसं म्हटले आहे.
हेही वाचा- हाय गरमी! दिल्लीमध्ये तीन दिवसात उष्माघाताने ५ जणांचा मृत्यू
पंजाब नॅशनल बँकेत असलेलं खातं जर सक्रिय नसेल, गेल्या तीन वर्षांमध्ये त्या खात्यात कोणतेही व्यवहार झाले नसतील, तसेच खात्यात पैसे नसतील तर अशी खाती आता बँक बंद करणार आहे. ज्यांना ही खाती सुरू ठेवायची आहेत, अशा खातेधारकांनी बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.