पॅरीस ऑलिम्पिक मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताच्या मनु भाकरने इतिहास घडवला असून कांस्य पदक जिंकले आहे . मनु भाकरची अंतिम फेरीत लढत कोरियाच्या स्पर्धकांशी होती. अंतिम फेरीत टॉप थ्री मध्ये ती पोहोचली. २२ शॉट नंतर ती बाहेर पडल्याने मनु भाकरला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने खातं उघडलं.
ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी मनु भाकर ही पहिलीच भारतीय महिला होती. याआधीही ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. पण तेव्हा तिला पदक पटकावण्यात अपयश आलं होतं. यावेळी तिने थेट अंतिम फेरीत धडक मारली होती. कोरियाच्या स्पर्धकांना तिने जबरदस्त लढत दिली. मनु भाकरचं फक्त ०.१ ने रौप्य पदक हुकलं. तिला टॉप थ्रीमध्ये पोहोचता आलं. मात्र कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
८.00 वाजता बॅडमिंटन -भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता पुरुष एकेरी ग्रुप स्टेजमध्ये एचएस प्रणॉयचा सामना असेल.
८.१८ वाजता, तिरंदाजी – दीपिका कुमारी, भजन कौर आणि अंकिता भकत यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागले असून तिरंदाजीत उपांत्य फेरीनंतर कांस्य पदकाची लढत रात्री 8.18 वाजता होईल. 8.41 वाजता तिरंदाजीची अंतिम फेरी होईल.