इतरताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

बाबो! 56 वर्षीय आजीने दिला चक्क नातीला जन्म, अमेरिकेतील या अनोख्या प्रसुतीची होतेय जगभरात चर्चा

वाॅश्गिंटन | आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोलाचं असून तिच्यासाठी ते एक स्वप्नच असतं. मात्र, आजकाल बऱ्याच महिलांना शारीरिक समस्यांमुळे आई होता येत नाही. अशावेळी त्या सरोगसी या पद्धतीचा वापर करतात. तसंच आजकालच्या जोडप्यांमध्ये सरोगसीचा पर्याय मोठ्या प्रमाणात निवडला जातो. सध्या याच्याशीत निगडीत एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे.

पीपीलमध्ये देण्यात आलेल्या एका अहवालानुसार, अमेरिकेतील एका आईनं सरोगेट बनून आपला मुलगा आणि सुनेच्या बाळाला जन्म दिला आहे. या अहवालात सांगितलंय की, या महिलेच्या सुनेला गर्भाशयाचा काही भाग काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली होती. त्यामुळे त्यांनी सरोगसीचा पर्याय निवडला होता. यावेळी जेफ हॉक या तरूणाच्या 56 वर्षीय आई नॅन्सीनं त्यांना सरोगेट म्हणून राहण्यास तयार असल्याचा पर्याय सुचवला. दरम्यान, ही गोष्ट त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली आणि नॅन्सीनं वयाच्या 56 व्या वर्षी मुलीला जन्म दिला आहे.

जेफने पीपलला यासंदर्भात सांगितलं की, ‘हा अतिशय सुंदर क्षण आहे. किती लोकांना आपल्या आईला जन्म देताना पाहायला मिळते?’ दरम्यान, मुलीला जन्म दिल्यानंतर नॅन्सी नव्या भावनांचा सामना करत आहेत. नॅन्सी यांनी सांगितलं, ‘यावेळी मी आनंद आणि वियोगाचं दुःख अशा मिश्र भावनांचा अनुभव घेतेय.’ विशेष म्हणजे या मुलीच्या आजीचा म्हणजेच नॅन्सीचा आदर म्हणून या जोडप्यानं आपल्या मुलीचं नाव ‘हॅना’ असं ठेवलं आहे. तसंच सध्या या बातमीची जगभरात चर्चा होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये