धक्कादायक! पुण्यात दहशतवाद्यांचा साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट
पुणे | Pune News | पुण्यात (Pune) धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरात दहशतवाद्यांचा साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट होता. यासंदर्भात दहशतवाद्यांना सिरीयामधून सूचना मिळत होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) पकडलेल्या दहशतवाद्याकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच इसिस मॉड्युल प्रकरणामध्ये ही आठवी अटक आहे. मागील आठवड्यात मोहम्मद शाहनवाज आलमला अटक करण्यात आली होती.
मोहम्मद शाहनवाज आलमला एनआयएनं अटक केली आहे. तसंच शाहनवाजचा यापूर्वी अटक केलेल्या आरोपींशी थेट संबंध होता. तर शाहनवाजने पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी विविध ठिकाणांचा शोध देखील होता.
19 जुलै 2023 रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात महम्मद इम्रान खान, महम्मद युनूस साकी आणि शाहनवाज आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. पण शाहनवाज कोंढवा परिसरातून पोलिसांना चकाव देत पळून गेला होता.