क्राईमपुणे

भाजपा माजी नगरसेवक शिळीमकर यांच्यासह चार जणावर गुन्हा दाखल

भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजेंद्र शिळीमकर यांच्यासह त्यांचा मुलगा अथर्व शिळीमकर, पुतण्या अर्चित शिळीमकर आणि महेश शिळीमकर अशा चौघांचा समावेश आहे.

शंकर महाराज मठात रूद्रअभिषेक करण्यासाठी मज्जाव करत, शिळीमकर यांनी मारहाण केल्याप्रकरणी चेतन आरडे यांचे उपोषण सुरू होत. या उपोषणाची दखल घेत पोलिसांकडून शिळीमकर पिता पुत्र पुतण्यांवर कारवाई केली आहे.

शंकर महाराज मठात रूद्रअभिषेक करण्याकरीता मज्जाव करत, अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करत व बेदम मारहाण केल्याचा आरोप शिळीमकरांवर आहे. या प्रकरणी पीडित चेतन आरोडे गेल्या पाच दिवसांपासून पुणे समाज कल्याण विभागासमोर उपोषणास बसले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईची पाऊले उचलली. घटना घडली त्यावेळी याप्रकरणी चेतन यांनी ११२ नंबरवर डायल करून पोलिसात तक्रार केली असता पोलीस घटनास्थळी पोहचले नाहीत.

यावेळी चेतन हे सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही जबाब वा तक्रार घेतली नाही. त्यामुळे पीडित हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसले होते.

यावेळी मारहाण व शिवीगाळ करण्याऱ्या संबंधित व्यक्तीपासून जीवितास धोका असून त्यांच्यावरती अनुसूचित जाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व मला न्याय द्यावा असे आरडे यांनी लेखी पत्र दिल होत. अखेर या पत्राची दखल घेत शिळीमकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये