आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील कामे पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनासमाेर आव्हान
लाेकसभा निवडणुकीच्या आचारसंहीतेमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामावर परिणाम झाला आहे, आता पुढील काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता लागू हाेईल. यामुळे विकास कामांवर परिणाम हाेऊ शकताे, हे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने वित्तीय समितीने मंजूर केलेल्या कामांच्या निविदा तातडीने काढाव्यात असे परीपत्रक जारी केले आहे.
या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील कामे पूर्ण करण्यासाठी महापािलका प्रशासनासमाेर आव्हान आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता हाेती. ही आचारसंहीता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपली. आता ऑक्टाेबर महिन्यात विधानसभा निवडणूक हाेण्याची शक्यता आहे. या कालावधीत निर्णय घेण्यावर मर्यादा पडतील. हे लक्षात घेता महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रकात तरतुद केलेल्या कामे मार्गी लागावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. यापुर्वी वित्तीय समितीने विविध खात्यांच्या विविध कामांना मंजुरी दिली आहे.
हेही वाचा- सिंहगडावरील वाहतूक कोंडीबाबत वनविभागाचा मोठा निर्णय; काय आहे? घ्या जाणून
वित्तीय समितीने मंजूर केलेल्या कामांच्या निविदा प्रक्रीया तातडीने सुरु कराव्यात, जाहिरात प्रसिद्ध करावी आणि लवकर काम सुरु करण्याचे आदेश प्राप्त करून घ्यावेत असे आदेश या परिपत्रकातून खाते प्रमुख, इतर अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेही वाचा- आषाढी वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज; पुणे विभागातून तब्बल ‘एवढ्या’ बसेस सोडणार
यासंदर्भात अतिरीक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, ‘‘ वित्तीय समितीने मान्यता दिलेली कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिका निवडणूक हाेण्याची चर्चाही सध्या सुरु आहे. पुढील काळात निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या कालावधीत कामांवर परीणाम हाेऊ शकताे. यामुळे आम्ही संबंधितांना निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यास सांगितले आहे.
हेही वाचा- पुणे महानगरपालिका मालामाल; मिळकतकरामधून तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे उत्पन्न
अभियंता भरतीची प्रक्रीया लवकरच
महापालिकेने विविध विभागांसाठी आवश्यक अभियंता या पदाची भरती प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरु केली हाेती. लाेकसभा निवडणुकीच्या आचारसंहीतेमुळे ती लांबणीवर पडली. आता पुन्हा ही भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
2 Comments