पुणे
पुराच्या पाण्यात वाहून आलेला कंटेनर धडकला पुलाला
मुठा नदीला आलेल्या पुरात एक मोठा लोखंडी कंटेनर वाहत आला आणि तो पुणे महापालिकेसमोरील पुलाला धडकला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नदीच्या पात्रात काही ठिकाणी कंटेनरमध्ये तात्पुरती ऑफिस थाटण्यात आली आहेत. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे हे रिकामे कंटेनर नदीतून वाहत पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे.
जास्त उंचीच्या पुलांच्या खालून वाहत असाच एक कंटेनर पुढे आला, मात्र पुणे महापालिकेच्या समोर नदीपात्रातील कमी उंचीच्या पुलाला ते धडकला. त्यामुळे पुलाचे देखील थोडे नुकसान झाले आहे. हा कंटेनर नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.