ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी; मिठाईच्या दुकानात मिळालं निनावी पत्र

मुंबई | Rahul Gandhi – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे (Bharat Jodo Yatra) चर्चेत आहेत. मात्र, या यात्रेदरम्यान राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. इंदूरमध्ये एका दुकानात हे निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवण्यात आलं होतं. या पत्रात राहुल गांधींना बाॅम्बने उडवू असं धमकावण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस आणि क्राइम ब्रांच सतर्क झाले असून हे निनावी पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. तसंच पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात येत आहेत.

दरम्यान, सध्या राहुल गांधी महाराष्ट्रात असून 24 नोव्हेंबरला इंदोरमध्ये असणार आहेत. खालसा स्टेडिअममध्ये ते रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहेत. तसंच मिळालेल्या धमकीनंतर त्या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये