इतरक्राईमपुणेसिटी अपडेट्स

पुण्यात धक्कादायक घटना! माजी नगरसेविकेला धमकावून तिच्यावर बलात्कार

पुणे | Pune Crime – पुणे (Pune) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील एका माजी नगरसेविकेला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे अमानुष कृत्य नगरसेविकेच्या मित्रानं केलं आहे. या प्रकरणी नगरसेविकेनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

माजी नगरसेविका असलेल्या महिलेची सचिन मच्छिंद्र काकडे (वय 43) या व्यक्तीशी मैत्री होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांचे मित्र होते. तर आरोपी सचिनने मैत्री संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी नगरसेविकेला दिली. तसंच धमकी देत त्यानं तिच्यावर अत्याचार देखील केला. धक्कादायक बाब म्हणजे 2017 पासून आरोपी सचिनने धमकावून नगरसेविकेवर अत्याचार केला.

तसंच पीडित नगरसेविकेच्या पतीला आपल्या मैत्री संबंधांबाबतची माहिती देईल, अशी धमकी देखील आरोपीनं दिली. तर मैत्री संबंधातून काढलेले फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यासाठी आरोपी सचिननं पीडितेकडे दहा लाखांची मागणी केली. त्यानंतरही तो तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यामुळे अखेर नगरसेविकेने पर्वती पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपी सचिनविरोधात गुन्हा दाखल केला. तर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ते पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये