क्राईमताज्या बातम्यापुणे

समलैंगिक असल्याचे लपवून केला विवाह; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे | मुलगा समलैंगिक असल्याचे लपवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नवविवाहित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही वडगाव शेरी परिसरात राहते. तिचे लग्न हे जुलै २०२२ रोजी एका तरूणाशी झाले. दरम्यान, विवाहानंतर तिला तिचा पती हा समलैंगिक असल्याची बाब लक्षात आली. दरम्यान, या बाबत तिने सासू-सासऱ्यांना विचारणा केली. मात्र, यावर उत्तर देण्याचे टाळत या तरुणीचा छळ तिच्या सासू सासरे आणि पतीने सुरू केला.

काही दिवस हा त्रास तरुणीने सहन केला मात्र, यानंतर कार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी तिच्या घरच्यांनी तिच्याकडे केली. या साठी तरुणीला धमकी देखील देण्यात आली. हा त्रास असह्य झाल्याने तिने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी याची दखल घेत कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये