अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

आवाजी मतदान पद्धतीने निवडणुका घेणारी मुलींची शाळा

शाळा हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचाच. इथे अनेकांच्या कलागुणांना वाव मिळतो. खेळापासून ते व्यक्तिमत्त्व विकासापर्यंत मुलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तसंच शाळा म्हणजे प्रत्येकासाठी विद्येचे माहेरघरच. शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण तर मिळतंच, मात्र शिक्षणासोबतच शाळेत वेगवेगळे उपक्रमदेखील राबवले जातात. उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतातच, सोबत नवीन गोष्टी स्वतःहून करायलाही मिळतात. अशीच एक शाळा आहे जी पुण्यातील सदाशिव पेठेत आहे. रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज असं या शाळेचं नाव आहे. ही एक खासगी अनुदानित फक्त मुलींची शाळा आहे. या प्रशालेत इ. ५ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थिनी शिक्षण घेतात.

कृतियुक्त अध्यापन , दृकश्राव्य माध्यम, प्रयोग, प्रश्नमंजूषा अशा विविध माध्यमांतून अध्ययन-अध्यापन केले जाते. याचा उपयोग करून विद्यार्थिनी स्कॉलरशिप , MTS, NTS यासारख्या बाह्यपरीक्षा, वक्तृत्व-निबंध स्पर्धा, Inspire Award, विज्ञान प्रदर्शन इ. मध्ये सहभागी होतात. तसंच मुलींसाठी थलसेनेचे NCC पथक देखील कार्यरत आहे. अशा शालेय उपक्रमाद्वारे गुणवंत व यशवंत विद्यार्थिनी निर्माण करण्याच्या कार्याची परंपरा शाळेनं जपली आहे. वेगळा उपक्रम म्हणजे रेणुका स्वरूप प्रशालेत आवाजी मतदान पद्धतीने निवडणुका घेण्यात येतात. या उपक्रमाद्वारे  मुली स्वतः निवडणुकीचा अनुभव घेतात आणि त्यामध्ये त्यांना नेतृत्वाची चांगली संधी मिळते. याचबरोबर रक्षाबंधन हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यामध्ये शाळेतील झाडांना राखी बांधून त्यांचं रक्षण करणारा हा उपक्रम राबविण्यात येतो. तसेच मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीनेदेखील योगाचे तास घेतले जातात. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर मुलींचा विकास होणं गरजेचं आहे, यासाठी व्यक्तिमत्त्व विकासदेखील शिकवला जातो.

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये