ज्ञानवापी सर्वेक्षणाला ‘सर्वोच्च’ स्थगिती
नवी दिल्ली | वाराणसीमधे ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. वाराणसीमधल्या ज्ञानवापी मशिदीचा वाद तापताना दिसत आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायाधीशांनी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर सोमवारी सकाळी पुरातत्व खात्याचे अधिकारी तिथे धडकले होते. पण त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईला किमान दोन दिवसांचा ब्रेक दिला आहे.
वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात येऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अधिक माहितीनुसार, एएसआयची 32 जणांची टीम सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वेक्षणासाठी ज्ञानवापी मध्ये पोहोचली होती.
हिंदू आणि मुस्लिम पक्षकार त्या ठिकाणी होते. त्यांना सर्वेक्षणात सामील होण्याची परवानगी देण्यात आली होती. अशातच ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण 26 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.