ताज्या बातम्यादेश - विदेश

दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशाने ओढली चक्क बिडी; पाहा धक्कादायक VIDEO

देशाची राजधानी दिल्ली नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. दिल्ली मेट्रोबाबतच्या चर्चाही अनेकदा रंगताना बघायला मिळतात. आत्तापर्यंत दिल्ली मेट्रोमध्ये आपण जोडप्यांची अश्लील कृत्य, मारामारी करतानाच्या घटनांचे व्हिडिओ बघितले. मात्र, आता दिल्ली मेट्रोमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमुळे दिल्ली मेट्रोमध्ये नेमकं चाललयं तरी काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की , एक व्यक्ती मेट्रोमध्ये बसून बिडी ओढत आहे. त्या व्यक्तीच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत. पण त्या व्यक्तीला बिडी ओढताना बघून कोणीच काही बोलत नाही. एवढंच नाही तर ती व्यक्ती कसलीच पर्वा न करता बेफिकीरपणे बीडी ओढताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/C8PJi7LBLem/?utm_source=ig_embed&ig_rid=d2e07015-8232-4e62-8a73-b92edc4634c2

दिल्ली मेट्रोमध्ये कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान करण्यास पूर्णपणे बंदी आहे. मेट्रोमध्ये असे करताना कोणी आढळल्यास शिक्षा आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांनी मेट्रो प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये