खळबळजनक! बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून केली हत्या; स्वतःलाही संपवले..
पुणे | पुण्यात (Pune) अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला आहे. या खुनानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
भरत शेखा गायकवाड (वय 57) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. खून केल्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. त्यांचे कुटुंब येथे रहात होते. ते अमरावती येथे नेमणुकीला होते. तर त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या पुण्यात रहात होते. नेमकी ही हत्या करण्याचे आणि त्यानंतर आत्महत्या याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
गायकवाड अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. गेल्या शनिवारी ते सुट्टीवर आले होते. पहाटे 4 च्या सुमारास त्यांनी गोळी झाडून हत्या आणि त्यानंतर आत्महत्या केली. त्यांनी परवाना असलेल्या त्यांच्या खासगी पिस्तूलातून गोळ्या झाडल्या आहेत.