इतरक्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्यानं सहकाऱ्याच्या पत्नीवर केला बलात्कार; फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली अन्…

अकोला | Akola Police Rape Case : पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतात, आपल्या मदतीला धावून येत असतात. पण आता याच पोलिसांवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न पडला आहे. कारण अकोल्यातून (Akola) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या सहकारी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. त्यामुळे अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिवम दुबे असं आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेत तो कार्यरत आहे. तर आरोपी पोलीस कर्मचाऱ्यानं सहाकरी मित्राच्या पत्नीसोबत फेसबुकवरून मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात अकोला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिवम दुबे फरार झाला आहे. सध्या पोलीस त्याचा तपास करत आहे.

आरोपी शिवम दुबेचं आपल्या सहकारी मित्राच्या घरी नेहमी येणं-जाणं सुरू असायचं. यादरम्यान त्याची वाईट नजर सहकारी मित्राच्या पत्नीवर पडली. त्यानंतर शिवमनं मित्राच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिनं रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. नंतर शिवमने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

काही दिवसांनंतर शिवमनं मित्राच्या पत्नीला ब्लॅकमेल करणं सुरू केलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी हा प्रकार पीडितेनं तिच्या पतीला सांगितला. तसंच पीडित महिलेनं आकोट शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी शिवम दुबेविरोधात तक्रार दाखल केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये