मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं, अपघातात 8 प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची भीती

मुंबई | Mumbai Plane Crash – मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एक मोठा अपघात घडला आहे. विमानतळावर खासगी विमान कोसळल्याची (Plane Crash) माहिती समोर आली आहे. या विमानामध्ये आठ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. तसंच या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विमानतळावर खासगी विमान कोसळल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर या विमानाला आग लागल्याचं देखील समजतंय. तसंच या एअरक्राफ्टमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे खासगी विमान विशाखापट्टनमवरून मुंबईला येत होतं. त्यावेळी हे विमान लँडिंग करताना त्याचा अपघात झाला. या अपघातामध्ये विमानाचे दोन तुकडे झाल्याचं म्हटलं जातंय. तसंच या विमानात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स असे एकूण आठ जण प्रवास करत होते.