पुणे

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! सिंहगड किल्ल्यावर उभारणार रोप-वे

सिंहगड किल्ल्यावर रोप-वे करणार असल्याच्या फक्त चर्चाच होत राहिल्या. आता, प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. या सुविधेमुळे पर्यटकांना गडावर जाणे सोपे होणार आहे. तासाला सुमारे १०० पर्यटक रोप-वे ने किल्ल्यावर जाऊ शकतात. या प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. हे काम खासगी कंपनी करणार आहे. सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आतकरवाडी येथून पायवाट आहे. आतकरवाडी ते किल्ल्यावर असलेल्या दूरदर्शनच्या टॉवरशेजारी रोपवे प्रकल्प साकारला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

हेही वाचा- वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा आनंदी; खेडमध्ये पेरणीच्या कामांना वेग

सिंहगड किल्ला शहरापासून जवळ असल्याने पर्यटकांचे हक्काचे ठिकाण आहे, त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी पावसाळ्यात नेहमी गर्दी होते. तसेच शनिवार, रविवारी आणि सलग सुट्ट्यांच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. सिंहगडवर किल्ल्यावर जाण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता अरुंद असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते, त्याचबरोबर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे हा घाट रस्ता १० ते १५ दिवस बंद ठेवावा लागतो. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते.

हेही वाचा- दिंडीतील वारकऱ्यांना मिळणार २४ तास आरोग्य सेवा

सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्यासाठी होणारी वाहतूक कोंडी, दरड कोसळणे यामुळे रस्ता बंद करावा लागत होता. यामुळे पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी त्रास होत होता. आता, मात्र सिंहगड किल्ल्यावर १.८ किमी लांबीचा ‘रोप-वे’ उभारला जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे, त्यामुळे पर्यटकांना सिंहगड किल्ल्यावर फक्त चार ते पाच मिनिटांत पोहचता येणार आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये