नाशिकमध्ये बस-ट्रकचा भीषण अपघात, 10 जणांचा जागीच मृत्यू

नाशिक : Braking News : (Nashik Travel Bus and Truck Accident) नाशिकमधील पाथरेजवळ (Pathare Bus and Truck Accident) भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. ट्रॅव्हल्स आणि एका ट्रकची (travels and truck accident on sinnar shirdi road) धडक झाली आहे. या भीषण अपघातात 10 जणांचा (10 dead in accident, several injured in Nashik) मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. (A travels and a truck accident at nashik sinnar shirdi road, pathare ishaneshwar mandir, 10 dead several injured)
नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या (ishaneshwar mandir pathare news) कमानीजवळ सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.