पुणे
पुराच्या पाण्यात पोहताना वाहून गेला वडापाव विक्रेता
पुराच्या पाण्यात पोहताना एक वडापाव विक्री करणारा तरुण वाहून गेला. पुण्यात माती गणपती जवळ ही दुर्घटना घडली.
पुण्यातील माती गणपतीजवळ वडा पाव विकणारा तरुण पाण्यात पोहण्यासाठी गेला असता वाहून गेला. दिनेश असे या तरुणाचे नाव आहे. नदीला पूर आल्यानंतर दिनेश हा अष्टभुजा मंदिर परिसरात पोहण्यासाठी पाण्यात शिरला आणि वाहून गेला.
दिनेशचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे.