क्राईमपुणे

घर कामासाठी ठेवलेल्या कामगाराने पळविले दागिने

तक्रारदार महिला पाषाण येथील सोमेश्वरवाडी भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. त्या व्यावसायिक आहेत. त्यांनी घरकामासाठी एकाला ठेवले होते. दोन वर्षांपासून तो महिलेच्या घरात काम करत होता. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून कामगाराने कपाटातील हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

कामगार कामावर न आल्याने महिलेचा संशय बळावला. त्यांनी कपाटाची पाहणी केली. तेव्हा कपाटातील दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये