ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

“…तू होतीस का माझी परी”; बीडच्या पठ्ठ्यानं गौतमी पाटीलला घातली लग्नाची मागणी, ‘त्या’ पत्राची होतेय जोरदार चर्चा

बीड | Gautami Patil – सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलची (Gautami Patil) चर्चा होताना दिसत आहे. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी तरूणाई अगदी आतुर असते. अनेकदा तिच्या कार्यक्रमांमध्ये वाद होताना देखील दिसले आहेत. मात्र, गौतमीचा चाहतावर्गही लाखांहून अधिक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच गौतमीच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. अशातच आता गौतमीला बीडच्या (Beed) एक तरूणानं पत्र लिहित लग्नाची मागणी घातली आहे. सध्या त्याचं हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय.

एका मुलाखतीत गौतमी पाटीलला तिच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी ती म्हणाली होती की, “मी आता 25 वर्षांची आहे. लग्न करून संसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. पण मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला पैसा, प्रसिद्धी, मान, सन्मान नकोय. मला फक्त त्यानं कोणत्याही परिस्थितीत साथ द्यावी. कारण मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नसल्यामुळे माझा पुरूष मंडळींशी कधीच संबंध आला नाही. त्यामुळे माझ्या संसाराचा भार आता एका पुरूषानं उचलावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे, असं गौतमीनं सांगितलं होतं. या दरम्यान आता गौतमीला बीडच्या रोहन दादा गलांडे (पाटील) या तरूणानं लग्नाची मागणी घातली आहे.

तरूणाचं गौतमीला लग्नाची मागणी घालणारं पत्र

“प्रिय, गौतमी तू भारी तुझ्या घरी, पण तू होतीस का माझी परी? मी रोहन दादा गलांडे (पाटील) तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. हे पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे एका मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवा आहे हे सांगताना तू म्हणाली होती की, “मी आता 25 वर्षांची आहे. लग्न करून संसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. पण मला फक्त माझ्या इच्छेप्रमाणे जाडीदार हवा आहे. मला पैसा, प्रसिद्धी, मान, सन्मान नकोय. मला फक्त त्यानं कोणत्याही परिस्थितीत साथ द्यावी. कारण मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नसल्यामुळे माझा पुरूष मंडळींशी कधीच संबंध आला नाही. त्यामुळे माझ्या संसाराचा भार आता एका पुरूषानं उचलावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे”, तर मला तुझ्या वरील सर्व अटी मान्य आहेत. मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तू जशी आहेस तशीच मला आवडली आहेस. तुझ्यासोबत जरी कुणी लग्नाला तयार नसलं तरी मी माणुसकीच्या नात्यानं तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. माझं वय आता 26 वर्ष आहे आणि मी एक शेतकरी पुत्र आहे. शेती बागायती असून आमचा दुग्ध व्यवसाय आहे. जर तू माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर तू मला भेटायला ये. पत्ता, मु. पो. चिंचोली (माळी), ता. केज, जि. बीड, पीन कोड 431123 आणि मोबाईल नं. ***. तर या पत्त्यावर तू मला भेटायला ये मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.

दरम्यान, बीडच्या या तरूणाचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. तसंच आता या तरूणाच्या मागणीवर गौतमी काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये