ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स
खळबळजनक! पुण्यात पाठलाग करत तरुणाची कोयत्याने हत्या
पुणे | Pune News : पुण्यात (Pune) पाठलाग करत कोयत्याने एका तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून पाठलाग करून कोयत्याने हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समजते.
गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. अधिक माहितीनुसार, सिद्धार्थ आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून खून केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.