ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

माझ्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबवा; आदित्य ठाकरे

मुंबई : (Aaditya Thackeray Bithday) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आज वाढदिवस असून यानिमित्ताने राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या वर्षी माझ्या वाढदिवसाऐवजी आपण सगळे 18 आणि 19 जून रोजी होणारे शिवसेनेचे राज्यव्यापी शिबीर आणि वर्धापण दिन सोहळ्याला भेटू असे आवाहन आधीच आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलेले आहे.

शिवसैनिक विविध सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करतात. यंदा आठवडाभरापासूनच विभागाविभागांत अशा उपक्रमांची सुरुवात झाली असून उद्या राज्यभरात अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, महाआरोग्य शिबीर, विद्यार्थी गुणगौरव, मोफत अन्नदान, रुग्णांना फळांच वाटप, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा यात समावेश आहे.

वाढदिवशी आपणा सर्वांनाच भेटायला मला आवडते, मात्र, 18 जून रोजी शिवसेनेचे राज्यव्यापी शिबीर आणि 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिव आपण जोशात साजरा करत आहोत. त्यामुळे महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा देणारे हे सोहळे आपण जोरात साजरे करू. त्यासाठी 13 तारखेऐवजी 18 आणि 19 जून रोजी आपण नक्की भेटू, असे आदित्य ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये