ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मुंबई महापालिका सोन्याची अंडे देणारी कोंबडी त्यांच्यासाठी, आदित्य ठाकरे म्हणाले; “आमच्यासाठी ही…”

मुंबई : (Aaditya Thackeray On Eknath Shinde) शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे मुंबईत पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, “मुंबई महापालिका सोन्याची अंडे देणारी कोंबडी ही त्यांच्यासाठी असेल, आमच्यासाठी ही कर्मभूमी आहे. गेल्या तीन महिन्यात मुंबईत किती इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट बंद झाले, नवे किती सुरु झाले? चांगले काम करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या 90 दिवसात 6 बदल्या झाल्या आहेत. यामध्ये खच्चीकरण मुंबईचं होत आहे,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी याआधीही आणि मुख्यमंत्री असताना इतर शहरांच्या तुलनेत मुंबईला प्राधान्य दिलेय. बीएमसीमध्ये तीन गोष्टी घडत आहेत. बीएमसीमध्ये टेंडर , ट्रान्सफर आणि टाईमपास या गोष्टी सुरू आहेत. मुंबईच्या रस्त्यामध्ये 5 हजार कोटी दिले जातील असं मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं आणि रस्ते खड्डे मुक्त होईल असा सांगितलं. पण आता हे ट्रेंडर स्क्रॅप केले आहेत. टेंडरचं काय झालं ? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

येत्या पावसाळ्यात मुंबईमध्ये खड्डे पडले तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी या सगळ्यावर बोलायला हवं. 1700 कोटी ब्युटीफिकेशनला वळवले, मात्र यात करायचं काय ? याच्या गाईडलाइन्स नाहीत. खोके सरकारमुळे 5 मोठे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेले नाही. ओला दुष्काळही जाहीर करण्यात आलेला नाही. उद्योग आणि कृषी क्षेत्र राज्यात कोलमडून जात आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये